Love Jihad | “लव्ह जिहादची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही”; अबू आझमींच्या वक्तव्यानं विधानसभेत गदारोळ

Love Jihad | Abu Azmi | मुंबई: राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत असतात. हे फार काही नवीन नाही. अशातच आता पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. सद्या महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रताप लोढा यांनी “१ लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणे झाली”, असल्याचे सांगितले. यावरून आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी ‘ही चुकीची माहिती लोढा यांनी दिली. त्यांनी माफी मागावी”, असे आझमी म्हणाले.

“लोढा यांनी माफी मागावी”; अबू आझमी यांची मागणी (Abu Azmi Demanded, Lodha Should Apologize)

“लव्ह जिहाद हा प्रकार सद्या नाही. अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. लोढा यांनी चुकीची माहिती दिली. यामुळे आता लोढा यांनी याबाबत माफी मागावी. ही मागणी अबू आझमी यांनी केली”, याच मागणीला जितेंद्र आव्हाडांनी देखील पाठिंबा दिला आहे. परंतु शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांनी लोढा यांना पाठिंबा दिला.

(Gulabrao Patil Replied To Abu Azmi And Jitendra Awhad)

आझमी आणि आव्हाडांच्या मागणीनंतर गुलाबराव पाटील यांनी लोढा यांना पाठिंबा दिला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “ज्यांना वाटतं की, लव्ह जिहाद नावाची गोष्ट नाही तर त्यांनी माझ्या गावी यावं. अशी दोन प्रकरणे आहेत.” त्यानंतर पाटील आव्हाडांना म्हणाले की, “तुम्ही मुंब्र्यात राहता म्हणून बोलू नका. तुम्हाला त्यांची गरज आहे. म्हणून बोलत आहात,” असा पलटवार गुलाबराव पाटलांनी केला आहे. तसेच आशिष शेलार म्हणाले, “ते हिंदू भगिनिसाठी बोलले यासाठी माफी मागायची का?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. यानंतर विधानसभेत गदारोळ माजला. हा गदारोळ अजित पवारांनी थांबवला.

अजित पवारांनी गदारोळ थांबवला (Ajit Pawar Stopped The Uproar)

“लोढा, अबू आझमी, आशिष शेलार, गुलाबराव पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यातील लव्ह जिहादच्या वक्तव्यावरून योग्य काय? ते घ्यावं अयोग्य काय? ते बाजूला सोडावं पुढचं काम सुरू करावं.” असे अजित पवार म्हणाले आणि त्यांनी गदारोळ थांबवला.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.