InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

फेसबुक लाईव्ह स्ट्रिमिंग करून केली आत्महत्या

- Advertisement -

राजस्थानच्या अलवरमध्ये एका २० वर्षीय तरुणाने एक्स गर्लफ्रेंडसोबत झालेल्या किरकोळ भांडणावरुन आत्महत्या केली.  निर्मल कुमावत (२०) असे बेहरोर येथे रहाणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

Loading...

आयुष्य संपवताना त्याने सोशल मीडियावर आपल्या शेवटच्या क्षणांचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले. एक्स गर्लफ्रेंडप्रती आपल्या तीव्र प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी तसेच तुझ्यासाठी मी मरणही पत्करु शकतो हे सिद्ध करण्यासाठी निर्मलने आत्महत्या केली. त्याने गोळया खालल्या व गळफास घेऊन आत्महत्या केली.

निर्मलने दोन तास आत्महत्येचा लाईव्ह स्ट्रीमिंग केले. प्रेमात झालेल्या फसवणुकीबद्दल तो खूप वेळ बोलला. निर्मल इतके टोकाचे पाऊल उचलत असताना कोणी त्याला थांबवले नाही. उलट लोकांनी कमेंट बॉक्स दु:ख होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. बेहरोर पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व २० वर्षीय निर्मलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.