Lumpy Skin Disease | लंपी आजाराने राज्यात ३२ गुरांचा तर जळगाव जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू

जळगाव : सध्या राज्यात लंपी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. मात्र पाहणी दौऱ्यानंतर लक्षात आले की अधिकारी आकडेवारी देण्यासाठी कार्यालयातच बसून असतात. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन पाहणी करावी आणि औषधोपचार व इतर मदत करावी, अशा शब्दांत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कानउघडणी केली. नियोजन भवनात पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला जळगाव, धुळे आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देखील केल्या.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.