Lunar Eclipse | चंद्रग्रहण झाल्यानंतर ‘या’ पद्धतीने घर करा स्वच्छ
टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये सूर्यग्रहण (Soler Eclipse) आणि चंद्रग्रहण (Lunar Eclipse) धार्मिक दृष्टिकोनातून शुभ आणि अशुभ मानले जाते. विज्ञान (Science) नुसार ही घटना खगोलीय घटना असली तरी ज्योतिष शास्त्रानुसार, या खगोलीय घटनेचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर प्रभाव पडतो. 25 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यात बहुतांश ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातून खगोलप्रेमींना खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या भौगोलिक घटना असून त्यांना ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे.
दरम्यान, ग्रहण काळामध्ये आपण आपल्या घरातील काही खास ठिकाणं जसे की मंदिर आणि स्वयंपाक नीट साफ केले पाहिजे अशी देखील मान्यता आहे. तर हिंदू धर्मामध्ये ग्रहणानंतर अनेक गोष्टींबाबत काही नियम सांगण्यात आले आहे. भोपाळ मधील ज्योतिष शास्त्रज्ञ हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील प्रमाणे ग्रहणानंतर घरामध्ये स्वच्छता करा.
चंद्रग्रहण (Lunar Eclipse) नंतर घरातील मंदिरात गंगाजल शिंपडा
मान्यतानुसार, चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. या कालावधीमध्ये मंदिरात कोणत्याही प्रकारची पूजा करण्यास बंदी असते. म्हणूनच चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घालून मंदिरात आणि घरामध्ये सगळीकडे गंगाजल शिंपडून घर पवित्र करावे. मान्यता नुसार, असे केल्याने चंद्रग्रहणाचा कोणताही नकारात्मक प्रभाव घरावर पडत नाही.
मान्यता नुसार, ग्रहण संपल्यानंतर घरात असलेल्या देवदेवतांच्या मूर्तीची चांगली साफसफाई करून घ्यावी. या मूर्तीच्या स्वच्छतेसाठी दही, दूध, चंदन, पाणी इत्यादी गोष्टींचा उपयोग करून त्यांना पंचामृताने स्नान घालावे. त्याचबरोबर सर्व मूर्तींचे वस्त्र बदलून त्यांना नवीन आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मान्यता नुसार, असे केल्यास घरामध्ये सुख आणि समृद्धी लाभते.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- BJP on Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं ; भाजप मंत्र्याची टीका
- IPL 2023 | कॅप्टन नंतर फिल्डिंग कोच पण बदलणार का पंजाब किंग्ज?
- Javhavi Kapoor | जान्हवी कपूरची ‘या’ अभिनेत्यासोबत आहे काम करण्याची इच्छा
- Sushma Andhare | राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘पार्सल’ म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना सुषमा अंधारेंचा पलटवार, म्हणाल्या…
- Chandrashekhar Bawankule | बारामती नंतर आता एकनाथ शिंदेच्या ठाण्यावर भाजपचा डोळा, चंद्रशेखर बावनकुळेंची जोरदार तयारी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.