Lunar Eclipse | वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ‘या’ राशीसाठी ठरू शकते शुभ

टीम महाराष्ट्र देशा: 25 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यात बहुतांश ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातून खगोलप्रेमींना खंडग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) पाहण्याची संधी मिळणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या भौगोलिक घटना असून त्यांना ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण झाले होते, तर आता हे दुसरे ग्रहण 15 दिवसात लगेचच पार पडणार आहे. ज्योतिष शास्त्राचे मते 15 दिवसांच्या आत दोन ग्रहण लागणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा स्थितीत वर्षाचे शेवटच्या चंद्रग्रहणाचा काही राशींवर अशुभ तर काही राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे.

‘या’ राशीसाठी शुभ ठरू शकते चंद्रग्रहण (Lunar Eclipse)

मिथुन

8 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण हे मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप खास आहे. या राशींच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण आनंद घेऊन येणार आहे. या चंद्रग्रहणानंतर या राशीचे लोक करियरमध्ये यशस्वी होतील. त्याचवेळी कामाच्या ठिकाणी या राशीच्या लोकांचे कौतुक होईल. आणि त्याच्या आधारावर या लोकांना प्रमोशनही मिळू शकते. त्याचबरोबर या राशीचे लोक कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील.

वृश्चिक

मिथुनबरोबरच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आनंददायी ठरू शकते. या राशीच्या लोकांची बरेच दिवसाची थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील. त्याचबरोबर चंद्रग्रहण दरम्यान वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांना या चंद्रग्रहणा नंतर प्रवासाची योग लागू शकतात. चंद्रग्रहणानंतर या राशीच्या लोकांना थांबलेले पैसे देखील परत मिळू शकतात. कर्क राशीच्या लोकांना प्रत्यक्षेत्रात यश मिळण्याची देखील शक्यता आहे.

टीप : वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.