Maa kanchangiri | मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहे. मध्यंतरी राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्येला जाणार होते. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी तो दौरा पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं होतं. आता माँ कांचनगिरी (Maa kanchangiri) यांनी राज ठाकरे यांना अयोध्येचं खास निमंत्रण दिले आहे.
माँ कांचनगिरी यांनी आज राज ठाकरेंची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दोऱ्याविषयी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “राज ठाकरे अयोध्येला नक्कीच जातील. प्रकृती चांगली नसल्यामुळे ते अयोध्येला पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आता अयोध्येला जाण्याची तयारी सुरू होईल. तुम्हाला फार लवकर याची बातमी मिळेल की ते अयोध्येला येत आहेत.”
यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंना ‘हिंदू सम्राट’ अशी उपमा दिली आहे. “राज ठाकरे यांच्या आरोग्याविषयी मी चौकशी केली. त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यासंदर्भात मी त्यांची भेट घेतली. त्यांना चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचं आरोग्य चांगलं राहायला हवं. आज राज ठाकरेंमध्ये खऱ्या अर्थाने ‘हिंदूसम्राट’ आपल्याला दिसतात. त्यामुळे मी त्यांना भेटायला आले”, असं त्या म्हणाल्या.
गुरु माँ कांचनगिरी कोण आहेत? (Who is Maa Kanchangiri)
गुरु माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केलं होतं. 1991 पासून त्यांनी युरोपीय देशात भारतीय सनातन हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. त्या गेल्या 20 वर्षांपासून त्या इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशातही हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत.
महाकाल मानव सेवान समितीच्या माध्यमातून त्या पर्यावरणाची जागृती करतात. महिलांच्या प्रश्नांवरही त्या काम करत आहेत. महिलांच्या चुकीच्या साक्षीमुळे ज्या पुरुषांना फसवले गेले आहेत. त्या पुरुषांना न्याय देण्याचं कामही त्या करतात. त्या आगामी काळात धर्म ध्वज यात्रा सुरू करणार आहेत. आत्महत्या करणाऱ्यांना या मार्गावरून न जाण्यासाठीही त्या प्रयत्न करत असतात.
महत्वाच्या बातम्या :
- Breaking | “अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, कामाला लागा”; राष्ट्रवादी आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनो ही आहे शेवटची संधी! लवकरात लवकर बँक खाते आणि आधार कार्ड करून घ्या लिंक
- IND vs AUS | पुजाराचा नवीन अवतार बघून कर्णधार रोहित शर्मा भडकला, पाहा VIDEO
- MNS | “जर हिंमत असेल तर…”; आदित्य ठाकरेंना मनसे नेत्याचं ओपन चॅलेंज
- Job Vacancies | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू