Maarrich Trailer | सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला तुषार कपूरचा ‘मारिच’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता तुषार कपूर (Tusshar Kapoor) ‘मारिच’ (Maarrich) या चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. तुषार कपूर या चित्रपटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशात शुक्रवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेल्या ट्रेलरला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेता तुषार कपूर शिवाय बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शहा, राहुल देव आणि अभिनेत्री अनिता हसनंदानी ही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
सस्पेन्स आणि थ्रीलसह ‘मारिच’चा ट्रेलर रिलीज
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘मारिच’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी ही पोस्ट शेअर करत, त्याला कॅप्शन दिले आहे की,”दोन क्रूर हत्या आणि सहा संशयित आणि एक धाडसी पोलीस. हा आहे तुषार कपूर आणि नसरुद्दीन शहा यांच्या क्राईम थ्रिलर ‘मारिच’ चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर.” या चित्रपटांमध्ये अभिनेता तुषार कपूर इन्स्पेक्टर राजीवच्या भूमिकेत खुनाचा पडदाफाश करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघून लक्षात येते की हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रीलने भरलेला आहे.
‘मारिच’ (Maarrich) कधी होणार रिलीज
‘मारिच’ या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांची चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी सगळेजण आतुर झाले आहेत. तुषार कपूरचा हा चित्रपट पुढच्या महिन्यात 9 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सुसज्ज आहे.
तुषार कपूरने एका मीडिया मुलाखतीमध्ये ‘मारिच’ बद्दल बोलताना सांगितले होते की, “हा चित्रपट माझ्यासाठी एक मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांमध्ये मला जेष्ठ कलाकार नसरुद्दीन शहा यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळत आहे. या चित्रपटामध्ये तुषार कुमार आणि नसरुद्दीन शहा व्यक्तिरिक्त राहुल देव आणि अभिनेत्री अनिता हसनंदानी महत्त्वाच्या भूमिका पार पडणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Congress | महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेनेत सावरकरांवरुन मतभेद! काँग्रेसने दिलं स्पष्टीकरण
- Devendra Fadnavis | “…तर कारवाई करु” ; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा
- T20 World Cup | टी 20 वर्ल्ड कप फायनल हरल्यानंतरही पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना मिळाले करोडो रुपयांचे बक्षीस
- MNS | पप्पू हाय हाय, राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देत मनसेचं आंदोलन
- MNS | मनसे आक्रमक! राहुल गांधींची सभा उधळण्यास गेलेल्या मनसे नेत्यांना रोखलं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.