Madhya Pradesh Accident | 14 घरांमध्ये मातम! दिवाळीला निघालेल्या प्रवाश्यांनी भरलेला बसचा ट्रकसोबत भीषण अपघात
Madhya Pradesh Accident | भोपाळ : देशभारत सगळ्यांच्या घरात आनंद पसरवणारा दिवाळी सणात १४ घरांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh Accident ) येथे दिवाळीला घरी जाणाऱ्या प्रवाश्यांनी भरलेल्या बसचा अपघात झाला असून १४ जणांचा मृत्यू झाला. अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहे. या घटनेनं संपुर्ण शहर हदरलं आहे.
मध्य प्रदेशमधील रिवा इथं हा अपघात घडला आहे. संबंधित बस हैदराबाद येथून लखनऊ कडे जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते. बहुतांश लोक ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 40 हून अधिक जण
जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.
पोलिस-प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात अनेकांचे पाय कापले गेले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान, २ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, ब्रेक न लागल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगत आहेत. तिसऱ्या वाहनाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बस- ट्रक घटनास्थळी आहे, मात्र तिसरे वाहन फरार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “‘पुणे तेथे काय उणे’ असं मिरविणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’चा…”, उद्धव ठाकरेंनी केली भाजपची थट्टा
- Uddhav Thackeray | “पुण्यात राहतोय की पाण्यात?”, पुण्यातील अवकाळी पावसावरून ‘सामना’मधून भाजपवर हल्ला
- Uddhav Thackeray | मातोश्रीवर खलबतं! गौतम अदानी नंतर अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
- Rupali Thombre | “छुपी युती असेल किंवा नसेल ती जगजाहीर करा, कटकारस्थान करू नका”
- Shinde-Fadanvis Govt | सीबीआयला राज्यात एन्ट्री करायला सरकारच्या परवानगीची गरज नाही – शिंदे-फडणवीस सरकारचा नवा निर्णय
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.