‘महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही’, फडणवीसांचा गंभीर आरोप!

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन 102 व्या घटना दुरूस्तीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे एखाद्या जातीला मागास ठरवून तिला आरक्षण देण्याचा राज्यांचा अधिकार केंद्र सरकारने मान्य केला आहे. याबाबत संसदेत विधेयक मंजूर केलं जाईल.

यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

१०२ व्या घटनादुरूस्तीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की राज्यांना अधिकार नाही तर केंद्र सरकारला आहेत. मात्र केंद्र सरकारने आता राज्यालाच सगळे अधिकार आहेत हे स्पष्ट केलं आहे. हे अधिकार मिळाल्यानंतर सगळी जबाबदारी राज्याकडेच येणार आहे. अशोक चव्हाण किंवा महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही. त्यामुळे ते रोज रोज नवीन बहाणे या ठिकाणी सांगतात.

खरं म्हणजे इंद्रा सहानीचा विषय अतिशय स्पष्ट आहे. आता राज्य सरकारला पहिल्यांदा मागास घोषित केल्याशिवाय पुढची कारवाई करता येत नाही. हा पहिला मुद्दा आहे, आरक्षण पुढला विषय आहे पहिला मुद्दा आहे तो मागास घोषित करण्याचा. ती कारवाई करण्यापासून राज्याला कुणी रोखलंय? याबाबत सरकार एक पाऊलही पुढे गेलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा