“महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाकीत होत आहेत, भाजपने ज्योतिषी बदलावा”

पुणे : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र, या तिन्ही पक्षांतील नेत्यांत कुरबुरी असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत आणि यावरुन महाविकास आघाडी सराकरमध्ये सर्वकाही आलबेलं नसल्याचं बोललं जात आहे. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार निशाणा साधला आहे.

शेलार म्हणाले राज्यातील सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असलेले सरकार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस हा घोटाळेबाज, काँग्रेस हा झोलबाज आणि शिवसेना हा दगाबाज असे हे तीन पक्षांचं राज्यातील सरकार आहे. ज्या पद्धतीने तीन पक्षांमध्ये आपापसात विसंवादाची रोज लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आम्हाला येतायत. या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असा काढता येऊ शकतो की, राज्यात निवडणूक केव्हाही लागू शकेल’, असं मोठं विधान आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्या दरम्यान केलं होत.

याच भाकीतावरुन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. पुण्यात आज ते माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेत्यांकडून वेगवेगळी भाकीतं केली जात आहेत. परंतु आता भाजपने आपला ज्याोतिषी बदलण्याची गरज आहे, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. तसेच यावेळी थोरातांनी मराठवाडा आणि विदर्भातील पूरस्थितीवर देखील भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा