Maha Vikas Aghadi vs Bjp | भाजपचं उद्या ‘माफी मागो’ आंदोलन ; महाविकास आघाडीच्या मोर्चाला देणार उत्तर

Maha Vikas Aghadi vs Bjp | मुंबई : भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा समस्या, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडी उद्या १७ डिसेंबरला महामोर्चा काढणार आहे. या मोर्चाला आता भाजप देखील आंदोलनाने उत्तर देणार आहे. भाजप संजय राऊत यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याविरोधात आक्रमक झाली आहे.

हिंदू-देवदेवतां व महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मुंबई भाजपातर्फे उद्या संपूर्ण मुंबईमध्ये ‘माफी मांगो’ आंदोलन करणार असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

“डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दोन पुस्तके संजय राऊत यांना पाठवले आहे. संजय राऊत यांनी संपूर्ण अभ्यास करावा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला?, यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुरु आहे. हे सर्व जाणीवपूर्वक सुरु आहे,” असे शेलार म्हणाले.

“बाबासाहेबांचा विचार असाच संपवता येणार नाही. त्यावर प्रश्न निर्माण करता येणार नाहीत. संजय राऊत यांना माफी मागावी लागेल”, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्याविरोधात भाजप उद्या माफी मागो आंदोलन करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.