InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महादेव जानकरांचा व्हिडिओ व्हायरल; मुंडे सुंडे फुंडे किस झाड कि पत्ती

- Advertisement -

राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा जुना व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. यात जानकरांनी मुंडे बिंडे सुंडे फुंडे किस झाड कि पत्ती असे म्हणताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. सद्या हा व्हिडिओ राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

काय म्हणाले जानकर या व्हिडीओ मध्ये? 

Loading...

मला सांगायचं आहे, मी काय करतो नरडीचा घोटाला हात घालतो. मी राजेश टोपे फोजेश टोपेला व्हॅल्यू देत नाही, मोहिते बिहितेला व्हॅल्यू देत नाही. मी काय करतो बाळ ठाकरेच्या नरडीचा आणि शरद पवारच्या नरडीचा घोट घेण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या समोर मुंडे सुद्धा फार मोठा नाही,  मुंढे फार शुल्क माणूस आहे, प्रमोद महाजन होते तोवर मुंढे होता आता किस झाड कि पत्ती, मुंडे बिंडे सुंडे फुंडे कोण असते काय नसते, असे बोलतांना महादेव जानकर दिसत आहेत. 

राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा व्हिडिओ सुप्रिया सुळे फॅन क्लब या फेसबुक पेज वर शेयर केला असून नेटकऱ्यांनी जानकरांच्या या व्हिडीओवर टीकेची झोड उठवली आहे.

Loading...

गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार आम्हीच – महादेव जानकर

‘आठवणीतले गोपीनाथ मुंडे’ या कार्यक्रमात महादेव जानकरांनी आपण गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार असल्याचं सांगितले होते. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जानकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एक ब्राम्हण लाखाला भारी ? जानकरांनी लावला मराठा समाजाला टोला

- Advertisement -

यापूर्वी मराठा आरक्षणावर टिपणी करताना, एक ब्राम्हण लाखाला भारी आहे असे व्यक्तव्य त्यांनी केलं होते. त्यांच्या या वक्त्यव्या नंतर मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे. मराठा समाजाच्या ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेला टोला बसल्याने जानकर यांच्यावर मराठा समाज नाराज झाला होता.
VIDEO Courtesy- Supriya sule FC Facebook Page

कोण आहेत महादेव जानकर ? 

महादेव जानकर हे महाराष्ट्रातील राष्ट्रीय समाज पक्षाचे जनक आहेत. राज्याचे दुग्धविकास मंत्री आहेत. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारा आपला पक्ष आहे असा त्यांचा दावा आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे. जानकर यांचा जन्म पळसावडे, ता. माण, जि. सातारा येथे एका गरीब धनगर कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथे झाले असून ते अभियांत्रिकी पदवीधर आहेत.

तरुण वयात जानकर यांच्यावर कांशीराम यांच्या विचारांचा प्रभाव होता. कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्ष पासून प्रेरणा घेवून जानकर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने जास्त असणाऱ्या धनगर समाजातील जानकर आहेत. तसेच त्यांची ताकद मराठवाड्यातही आहे. त्यामुळे त्यांना डावलणे सहज सोपे नव्हते. त्यामुळे भाजपने त्यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले .

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. जानकर यांना एकूण ४५१,८४३ मते मिळाली होती. सुळे यांना ४८.८८ % मते मिळाली तर जानकर यांना ४२.३५ % मते मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांचा पराभव झाला होता.

टीप-  या व्हिडीओची आम्ही पुष्टी केलेली नाही; सद्या या व्हिडीओ बाबत मतमतांतरे चालू आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.