‘या’ 12 जागांवरून भाजप-शिवसेनेचं युतीचं घोडं अडलं

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असली तरीही युतीचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. भाजपकडून शिवसेनेला 115 जागांचा प्रस्ताव, मात्र 125 च्या मागणीवर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे 10 ते 12 जागांवर युतीचं घोडं अजूनही अडल्याचं दिसत आहे.

संयुक्त पत्रकार परिषदेत आज शिवसेना युतीची घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र काही जागांवर दोन्ही पक्षांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आज संयुक्त पत्रकार परिषद होत युतीची घोषणा होण्याची शक्यता मावळली आहे.

भाजपने आपली वाढलेली ताकद दाखवून देत 122 जागांपर्यंत मजल मारली. यंदा मात्र दोन्ही पक्षांनी एकत्रिपणे विधानसभा निवडणुकांचा सामना करत आहेत. मात्र काही जागांवरून युतीचं घोड अडलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल तसंच विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया आणि मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर आणि ठाण्यातील उल्हासनगर या जागांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.