शरद पवारांना गरीबी काय माहीत? – अमित शहा

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरले आहेत. या शेवटच्या दिवशी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. बहुतेक सगळे उमेदवार आपापल्या मतदारसंघात आहेत. केंद्रीय गृहमंत्री यांच्यादेखील आज राज्यात सभा आहे. दरम्यान, नंदुरबारच्या सभेमध्ये यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. नवापुर मतदारसंघात आजतागायत एकदाही भाजपाचा विजय न झाल्यानेच मुद्दाम याठिकाणी प्रचार सभा घेतली.

राहुल गांधी, यांच्यावर 370च्या भुमिकेवरुन टीका केली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत 370कलमचं काय काम? या प्रश्नांवरुन अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. ‘कलम ३७० उखडुन फेकण्याचे काम मोदी सरकारने केले. कलम 370च्या माध्यमातुनच पाकीस्तानने काश्मीरमध्ये आंतकवाद पसरवला. पण वोट बँकच्या चिंतेने काँग्रेसने 370 हटवण्यास विरोध केला. हिम्मत असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्यास 370परत लागू करा अशी घोषणा करा. बघा महाराष्ट्रातील जनता तुमचे काय हाल करते’ अशा शब्दात अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.