InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाविकास आघाडीत पेच! उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार?

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध नाना पटोले तर विरोधी पक्षनेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. आता लक्ष खाते वाटपाकडे आहे. दरम्यान 3 आणि 4 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे खातेवाटपाबाबत आता उत्सुकता आहे. तसंच उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अजूनपर्यंत कोणाचाच नावावर शिक्कामोर्तब झालं नाही.

Loading...

महाविकास आघाडीत काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरीही अद्यापही या मंत्र्यांना कोणतंही खातं देण्यात आलं नाही. अजून खातेवाटपाबाबत वाटाघाटी सुरू असल्याची स्थिती महाविकासआघाडीत आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.