शिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला तुडवले

औरंगाबाद : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी ांना लाथा मारल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे.  पक्षप्रमुख यांना आंदोलकाने शिवीगाळ केल्याचा आरोप करत अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला अक्षरश: लाथडलं.

मराठा समाजाकडून आज आरक्षणाच्या मागणीसाठी ‘’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच निमित्ताने औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी सकाळी शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आले होते.

यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा द्यायला सुरवात केली. काही तरुणांनी मुख्यमंत्री फडणवीस मुर्दाबाद, उद्धव ठाकरे मुर्दाबाद अश्या घोषणा देऊ लागले. त्यामुळे अंबादास दानवे यांचा पारा चढला आणि त्यांनी मराठा आंदोलकांना शिवीगाळ करत घोषणा देणाऱ्या आंदोलकाला लाथा मारल्या . दरम्यान आंदोलकांनीही अंबादास दानवे यांना धक्काबुकी करत चोप दिला. अपमानीत झालेल्या दानवे यांनी ‘ तुम्हाला पाहून घेतो’ अशी धमकी दिली.

त्यानंतर अज्ञात लोकांनी घोषणा देणाऱ्या एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘ तू येथून निघून जा नाहीतर जीवाला मुकशील, तू कोणाशी पंगा घेतला आहे तुला माहित नाही. चल निघ येथून ‘  असे धमकावले. आंदोलक तरुण जिवाच्या धास्तीने घरी निघाला. घरी जात असताना अज्ञात गुंडानी त्याला रस्तात अडवून, एका वाहनात बळजबरीने बसवून त्याला अज्ञात स्थळी नेउन लाथा-बुक्कांनी बेदम मारहाण केल्याचं वृत्त औरंगाबाद येथील स्थानिक दैनिकाने प्रकाशित केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या विरोधात काहीही खपवून घेणार नाही. जे काही होईल त्या परिणामांना मी सामोरं जाण्यासाठी तयार आहे, मी शिवसैनिकही आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द खपवून घेऊ शकत नाही असे सांगत अंबादास दानवेंनी घडल्या प्रकाराचं समर्थन केलं.

अंबादास दानवे हे मराठा आंदोलकाला लाथा मारत असल्याचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.