महाराष्ट्र बंद : पुण्यातील तोडफोड प्रकरणातील 113 जणांना न्यायालयीन कोठडी

पुणे : मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये तोडफोड आणि दगडफेक करणाऱ्या 194 जणांना पोलिसांनी अटक केली होती, धुडगूस घालणाऱ्या या सर्व आंदोलकांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी 21 जणांना जामिनावर मंजूर करण्यात आला आहे, तर 113 आंदोलकांची न्यायालयीन आणि 58 जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान, पुण्यात झालेल्या तोडफोडप्रकरणी 194 जणांना पोलिसांनी अटक केली होती. काल बंदच्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती, तर चांदणी चौकामध्ये देखील दगडफेक करण्यात आली होती.

बंदवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनं करण्यात आले. या आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आली. तसेच चांदणी चौकामध्ये दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. तर जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला.

पुणे महाराष्ट्र बंद जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड प्रकरण एकूण 80 जणांना अटक, अटकेतील दोन मुले अल्पवयीन, उरलेल्या पैकी 5 महिलां 73 युवकांना न्यायालयीन कोठडी.

पुण्यात जनजीवन सुरळीत; मात्र बंद दरम्यान ५५ पीएमटी बसची तोडफोड

  • न्यायालयीन कोठडीतील 73 जण जामिनासाठी अर्ज करू शकतात
  • चांदणी चौक दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 55 जणांपैकी 50 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि उर्वरित 5 जणांना न्यायालयीन कोठडी
  • डेक्कन प्रकरणातील 21 जणांचा जामीन
  • हिंजवडी 8 जणांना एक दिवसीय पोलीस कोठडी
  • वारजे हिंसाचार प्रकरणातील 30 जणांना न्यायालयीन कोठडी
महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.