‘महाराष्ट्र बंद’ : पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव

 पुणे : सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंसक वळण लागले. मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.

सकाळपासून पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात दुकाने, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उत्स्फूर्तपणे बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ठिकठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी दुचाकीवरील रॅली, घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन शांततेत करावं असं आवाहन कालच करण्यात आलं होतं मात्र या आवाहनाला आंदोलाकानीच केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडल्याची देखील माहिती समोर आली आहे.

मराठा समाजाला देण्याच्या मागणीसाठी मागील 15 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जात आहे.

उद्याची सकाळ शेकापचीच !

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.