‘दोन दिवसांत खातेवाटप करु’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

बहुमत चाचणी, विधानसभाध्यक्ष निवडणूक, विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती यासह इतर कामासाठी बोलवण्यात आलेलं विधिमंडळाचं अधिवेशन काल संपलं आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मंत्रिमंडळाचं खातेवाटप करु अशी घोषणा खुद्द नवनिर्वाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी खातेवाटपाचा मुहूर्त जाहीर केला.

सरकारचे जाहीर झालेले सात मंत्री एकत्रीतपणे काम करतो आहे. सगळी खाती आम्ही सात लोकं व्यवस्थितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होईल अस काही होतं नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. नुकतचं पहिलं अधिवेशन पार पडलं आहे. मंत्रिंमंडळाने कामकाज करायला सुरुवात केलीय. एकूणचं राज्यातील परिस्थितीची महिती घ्यायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळाची प्राथमिक बैठक रविवारी झाली असून राज्याच्या परिस्थितीचं सगळ चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरु होईल.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.