InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘महाराष्ट्र बंद’ : पंढरपुरात भाविकांचे हाल

- Advertisement -

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने, संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. मंदिर परिसर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकाने बंद होती. यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले.

पंढरपूर शहराकडे येणारे रस्ते आंदोलकांनी रोखून धरल्याने खाजगी वाहतूक ठप्प आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी २०० एसआरपीची जादा कुमक बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आली आहे. बंद शांततेत पार पाडण्यासाठी सकल मराठा समाजाचे तरुण प्रयन्तशील आहेत.

- Advertisement -

दरम्यान, कुर्डूवाडी शहरातील सर्व रस्ते , बायपास येथे तरुळक वाहतुक सुरु होती , रस्त्यावर चार चाकी एकही वाहन दिसत नव्हते , तालुक्याक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद होती. शहरातील एस.टी.सेवा , माढा तालुका मोटार चालक मालक संघ , यांच्यासह विविध संघटनांनी आज वाहतुक बंद करुन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. साप्ताहिक मंडई , साप्ताहीक जनावरांचा बाजारही बंद होता . यावेळी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.