देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत भाषण केलं. या भाषणावर विरोधी पक्षाने आपलं मत मांडलं. त्यानंतर काल या धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणातून मोदींनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर जोरदार निशाणा साधला. मोदींनी शेरोशायरीतूनही काँग्रेसवर हल्ला चढवला.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, करोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने आणि दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे अनंत हाल-अपेष्टा सहन करत या मजुरांना आपापल्या गावी परत जावे लागले. देशात करोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील ‘आप’ कारणीभूत आहेत.

तसेच या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केली.कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वांनी जिथं आहात तिथंच थांबा, असं म्हटलं होतं. पण काँग्रेसनं यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. कोरोना लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने तर हद्दच केली, त्यांनी मुंबईतल्या परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकीटे काढून दिली.

तसेच पुढे महाराष्ट्रावरील बोजा कमी करण्याचं आवाहन केलं. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप केला. यूपी बिहारमध्ये जाऊन कोरोना पसरवा असं ते स्थलांतरीत मजुरांना सांगत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा