InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बीडमध्ये दुष्काळ परिस्थितीत चारा छावणीत मोठा भ्रष्टाचार; शिवसेना जिल्हाप्रमुखांचे पितळ उघडे

चारा छावणीत भ्रष्टाचार केल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या चारा छावणीत तब्बल 800 बोगस जनावरे दाखवण्यात आली होती. प्रशासनाने या भ्रष्ट शिवसेना जिल्हाप्रमुखाचे पितळ उघडे पाडत कारवाई केली आहे.

बीड तालुक्यातील कोल्हारवाडी इथल्या चारा छावणीला उपजिल्हाधिकार्‍यांच्या तपास पथकानं भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखानं छावणीतील काळेबेरे उघड होऊ नये म्हणून छावणी तपासणीसाठी आलेल्या महिला उपजिल्हाधिकार्‍यांच्या पथकाला तपासणीपासून तासभर रोखलं. तसंच त्यांच्याशी हुज्जतही घातली.

इतकी जनावरे गेली कुठे आणि कशी या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला अद्याप छावणी चालकांनी दिलेले नाही. 6 मे रोजी पुन्हा जनावरांच्या आकड्याने 1607 ही संख्या गाठली आहे. आजचा आकडा 1600 च्या घरात आहे. मात्र प्रत्यक्ष 800जनावरे दिसून आली आणि बोगसगिरी उघड झाली. विशेष म्हणजे या “मत्स्यगंधा” संस्थेला तब्बल 15 छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वजन वापरून भ्रष्टाचार करणाऱ्या य मुजोर चारा छावणीचा चालक शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply