InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ?’, राज ठाकरेंच्या या प्रश्नाला शिवसेनेने दिले उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दुष्काळ प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.  29 हजार गावात दुष्काळ जाहीर झाला, मग सिंचनाबाबत काय कामं केली असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. आता यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.

जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांना विचारावा” असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अनिल परब यांनी दिले आहे.

अनिस परब म्हणाले की, गेल्या पाच वर्षात दुष्काळाबाबत युती सरकारने केलेली कामे लोकांसमोर आहेत. दुष्काळ हा नैसर्गिक कोप आहे. त्यावर मार्ग काढणे हे सरकारचे काम आहे, पाऊस पाडणे हे सरकारचे काम नाही. पण पाऊस पडला नाही तर अडचण निर्माण होते. त्यावरच्या उपाययोजना सरकारने ठरवायला हव्या. युती सरकारने प्रयत्न केले ते दिसत आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.