अखेर काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होणार

- Advertisement -
काँग्रेसनं अखेर शिवसेनेला पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यांच्या जोरावर त्यांचं संख्याबळ ११८ पर्यंत गेलं. मात्र, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ – अर्थात भाजपा-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली आणि त्याचा भडका उडाला. त्यामुळे ३० वर्षांपासूनचे हे मित्र सरकारस्थापनेसाठी एकत्र आले नाहीत.
Loading...
Related Posts
- Advertisement -
त्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत हालचालींना वेग आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या अनेक बैठका झाल्या. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्यास राष्ट्रवादीचे बहुतांशी नेते, आमदार तयार होतेच. त्यावर शरद पवारांनीही मोहोर उमटवली. पण, काँग्रेसकडून शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई अहमद पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या आणि प्रदीर्घ चर्चेनंतर, हो-नाही करता-करता काँग्रेसनंही महाशिवआघाडीला होकार दिला.
Loading...