InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

फडणवीसांचा मुक्काम अजूनही ‘वर्षा’वरचं; काय आहे कारण?

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. शिवसेना आणि भाजप महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमत दिले. मात्र मुख्यमंत्रीपदावर त्यांचा वाद विकोपाला गेला. शिवसेनेने पाठिंबा न दिल्याने भाजप सत्ता स्थापन करु शकले नाही. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला आणि राष्ट्रवादीलाही राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवले पण सत्ता स्थापन होऊ शकली नाही. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यानंतर सर्व मंत्र्यांना आपले कार्यालय रिकामे करण्याचा अद्यादेश जारी करण्यात आला. मात्र देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावरच आहेत. त्यांनी बंगला अजूनही सोडलेला नाही.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांच्या काळात मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईलचा नारा दिला. मात्र आता पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही हे स्पष्ट होत आहे. दरम्यान फडणवीस यांना आता वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे. मात्र त्यांनी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम वर्षा बंगल्यावरच असणार आहे.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.