InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘स्वच्छ सर्वेक्षण अभियाना’मध्ये महाराष्ट्र अव्वल

‘स्वच्छ सर्वेक्षण अभियाना’मध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राने तिसरे स्थान मिळवले असून, त्यासह सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावत देशान अव्वल स्थान मिळवले आहे. काल नवी दिल्लीत  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या अभियानात राज्यातील २७ शहरे कचरामुक्त ठरली आहेत. यामध्ये मूल, वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, महाबळेश्वर, पाचगणी, रत्नागिरी, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, विटा, तासगाव, कोरेगाव या शहरांचा समावेश आहे. या अभियानात नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठी असलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मुंबई महापालिकेस देण्यात आला.

पहिल्या शंभरांत महाराष्ट्रातील २४ शहरे – 

या अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या पहिल्या १०० शहरांमध्ये महाराष्ट्रातील २४ शहरे आहेत. या शहरांमध्ये नवी मुंबई (७), कोल्हापूर (१६), मीरा-भाईंदर (२७), चंद्रपूर (२९), वर्धा (३४), वसई-विरार (३६), पुणे (३७), लातूर (३८), सातारा (४५), पिंपरी-चिंचवड (५२), उदगीर (५३), सोलापूर (५४), बार्शी (५५), ठाणे (५७), नागपूर (५७), नांदेड-वाघाळा (६०), नाशिक (६७), अमरावती (७४), जळगाव (७६), कल्याण-डोंबिवली (७७), पनवेल (८६), अचलपूर (८९), बीड (९४) व यवतमाळ (९६) या शहरांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply