शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. सद्यस्थिती सर्वांचे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागलं आहे. तर दुसरीकडे पुण्यात सत्ता स्थापनेवरुन बॅनरबाजी सुरु झाली आहे. पुण्यात काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे एकत्रित बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेचा दावा करणार असल्याचंही बोललं जात आहे.

पुण्यातील कोंढावा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या तिन्ही नेत्यांचे एकत्र फोटो असलेला बॅनर लावण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्वीकारला आहे. बळीराजाच्या मनातील अन् हातातील घड्याळाच्या अचूक वेळेन, धनुष्यातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा… असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

Loading...

पुण्यात काही ठिकाणी अशा प्रकारे बॅनर लागले आहेत !

Supriya Sule FC ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ನವೆಂಬರ್ 8, 2019

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.