InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक नेत्यांचे भवितव्य होणार ईव्हीएम मशीनमध्ये कैद

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील 10 मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडणार आहे. यामध्ये  बीड, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद आणि सोलापूर मतदारसंघांचा समावेश आहे.

आजच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदासंघांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे.

Loading...

- Advertisement -

10 मतदारसंघातील 20 हजार 716 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत. 

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.