InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं?’, अजित पवारांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या माढ्यातील सभेत आपल्याला जातीवरून टार्गेट केलं जात असल्याचे म्हटले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोदींना उत्तर दिले आहे. मोदींकडे बोलायला कोणतेच मुद्दे नसल्यामुळे मोदी जातीवरून बोलत आहेत. नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं?, असा सवाल अजित पवारांनी केला आहे.

सगळे मोदी हे चोर कसे ? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला होता. याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या जातीशी जोडले आहे. मी मागासवर्गीय असल्यामुळेच माझ्यावर अशी टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply