InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अकोल्यात मतदाराने ईव्हीएमच फोडले

अकोला मतदारसंघात एका मतदाराने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे. श्रीकृष्ण घ्यारे असे ईव्हीएम फोडणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

बाळापूर तालुक्यातील कवठा मतदानकेंद्रावर ही घटना घडली आहे. या मतदानकेंद्रावर नवीन ईव्हीएम देण्यात आलं आहे. श्रीकृष्ण घ्यारे यांनी ईव्हीएम का फोडले अद्याप समजू शकलेले नाही. 

तसेच, राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडत आहेत. भोकर, नायगाव, मुखेड, नांदेड उत्तर आणि दक्षिण, देगलूर या ठिकाणी एकूण 78 मशीन बंद पडल्या. त्यानंतर प्रशासनाने या मशीन्स बदलल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply