InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विधानसभेत मनसे सोबतच्या आघाडीबाबत शरद पवारांनी केली भूमिका जाहीर

यंदाची लोकसभा निवडणूक मनसे लढवणार नसली तर या वर्षा होणारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत मनसे राष्ट्रवादी बरोबर आघाडी करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मागील काही दिवसांपासून, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या गाठीभेटी देखील वाढल्या आहेत.

कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मनसेसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबतही भाष्य केलं आहेत.

शरद पवार म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम आहे. मोदी-शहा जोडी देशाला घातक आहे, हे त्यांना सांगायचं आहे. त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार असतील. चुकीच्या लोकांच्या हातून राज्य काढून घेण्यासाठी उद्याच्या काळात चर्चा होऊ शकते,’ असे म्हणत शरद पवार यांनी मनसेबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.