Madhav Bhandari |अहमदनगर : काल (11मे ) महाराष्ट्राच्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सर्वोच्च न्यायालयाने वाचून दाखवला आहे. यामध्ये कोर्टाकडून अनेक मुद्धे मांडले असून 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. लवकरात- लवकर अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. निकालानंतर सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. तर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत निकालाबाबत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला असल्याचं म्हटलं. त्यावर आता भाजपचे जेष्ठ नेते माधव भंडारी ( Madhav Bhandari) यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले माधव भंडारी (What did Madhav Bhandari say)
माध्यमांशी संवाद साधताना माधव भंडारी म्हणाले की, उद्धव ठाकरेंना 2019 मध्ये सरकार स्थापन करताना नैतिकता हा शब्द देखील आठवला नाही त्यांनी आता नैतिकतेबद्दल बोलू नये. ज्यांनी नैतिकता पाळलेली असते त्यांनीच नैतिकतेबद्दल भाष्य करावं. अशी टीका माधव भंडारी यांनी उद्धव ठाकरेंनवर केली आहे. तसचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निकालानंतर ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं की, जेव्हा ठाकरे भाजपसोबत निवडून आले आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती. तुम्हाला नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. असा निशाणा फडणवीस यांनी ठाकरेंवर साधला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होत की, “अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांवर सोपवला असला तरी पक्षादेश आमचाच राहील. त्याचबरोबर अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मी करणार आहे. कारण माझी लढाई सत्तेसाठी नाही तर माझी लढाई जनतेसाठी आणि देशासाठी आहे. मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला असल्याचं देखी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. याचप्रमाणे जसा मी राजीनामा दिला होता तसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही द्यावा आणि निवडणूक लढवण्यासाठी मैदानात यावं, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा! समोर आली महत्त्वाची माहिती
- Sharad Pawar | देशातल्या विरोधकांचं नेतृत्व करणार शरद पवार; नितीश कुमार म्हणतात…
- Eknath Shinde | उद्धव ठाकरेंकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र
- Chitra Wagh | कावळा कोण आणि कोकिळा कोण? हे सिद्ध झालं; कोर्टाच्या निकालानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
- Devendra Fadnavis | “…तेव्हा उद्धव ठाकरेंची नैतिकता कुठे होती?”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल