Maharashtra Political Crisis | सरकार कोसळण्याच्या भीतीने चार दिवसात घेतले 212 शासन निर्णय
Shivseva Case | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल काही वेळात जाहीर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशात शासन निर्णय संकेतस्थळावर आज एकाच दिवसात तब्बल 40 GR म्हणजेच शासन निर्णय घेतल्या गेल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. यानंतर सरकार कोसळण्याच्या भीतीने कामाचा वेग वाढला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या सात दिवसाची हीच आकडेवारी थक्क करणारी आहे. गेल्या आठवड्यात सरकारने तब्बल 212 शासन निर्णय घेतले असल्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस सुट्ट्या होत्या, म्हणजेच सरकारने 3 ते 4 दिवसात हे 212 शासन निर्णय घेतले आहे.
शासन निर्णय वेगाने काढले जात नसल्याने अनेक योजना, प्रकल्प आणि कामं अडकले आहे. तर अशाच पद्धतीने वेगाने काम करणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारचे शेकडो GR रद्द करण्यात आले होते. सरकार कोसळण्याच्या आधी अशा प्रकारचे शासन निर्णय काढण्यात आले होते. मात्र, त्यावर नंतरच्या सरकारने आक्षेप घेऊन ते रद्द केले होते.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार कायम राहील का? यावर प्रश्न उपस्थित आहे. सरकार कोसळण्याच्या आधी GR काढायची ही घाई नसेल ना? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Political Crisis | ‘आम्ही न्याय विकत घेणारी माणसे नाही’ – संजय राऊत
- Shiv Seva Case | सत्ता संघर्षाच्या गोंधळात फडणवीस मुख्यमंत्री होणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा दावा
- Shiv Sena Case | शरद पवारांच्या सांगण्यावरून नरहरी झिरवळ गायब? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Weather Update | कुठे तीव्र उन्हाळा, तर कुठे पावसाचा इशारा, पाहा हवामान अंदाज
- Jayant Patil | आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना ईडीचे नोटीस
Comments are closed.