Maharashtra Rain Update | राज्यात परतीचा पाऊस उघडण्याची शक्यता, तर आज सर्वत्र पावसाचा जोर कमी
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सर्वत्र परतीचा पाऊसाने थैमान घातले आहे. गेले अनेक दिवस राज्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमाकूळ घातली आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. त्याचबरोबर या परतीचा पावसाचा शेतीतील पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मुंबई पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान, आजपासून परतीचा पाऊस माघारी फिरणारा आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. आज राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी असून उद्यापासून (15 ऑक्टोबर) राज्यात परतीच्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता
ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 20 ते 24 ऑक्टोबर म्हणजेच दिवाळी सणदरम्यान किरकोळ पावसाची शक्यता आहे. रब्बी हंगामाचे शेवटच्या टप्प्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर उद्यापासून राज्यातील मान्सून परत फिरणार असून राज्यात पावसाची उघडीप होणार आहे.
परतीच्या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान
राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाला असून राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या राज्यात शेतीतील पीक काढण्याच्या हंगाम सुरू आहे. शेतीतील सोयाबीन, कापूस, मूग तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पिक काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्याची उभी पिके पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हवामान खात्याने अंदाजानुसार राज्यात आजपासून परतीचा पाऊस माघारी करणार आहे.
राज्यात ढगाळ वातावरण असले तरी परतीचा पाऊस मागे फिरणार
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मागच्या आठवड्यात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र सह कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात परतीच्या पावसाची चांगलीच हजेरी होती. या पावसामुळे शेतकऱ्याची हाता तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यात ढगाळ वातावरण असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची उघडीत असेल. त्याचबरोबर उद्यापासून 15 ऑक्टोबर पासून राज्यात परतीचा पाऊस माघारी फिरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्या मुलाची पीएचडी पदवी वादात, मुंबई विद्यापीठाने अवघ्या १४ महिन्यात दिली पदवी
- Eknath Khadse | मला जर इतका संघर्ष करावा लागत असेल तर सर्वसामान्यांना किती संघर्ष असेल – एकनाथ खडसे
- Rutuja Latke | अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा अर्ज स्वीकारला, उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा
- Rutuja Latke | “आज जर रमेश लटके साहेब सोबत असते, तर…”, निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी ऋतुजा लटके झाल्या भावूक
- Chhagan Bhujbal । “मी बाळासाहेब ठाकरेंविरोधात अब्रू नुकसानीचा खटला केला, कारण…”; छगन भुजबळांनी सांगितला जुना किस्सा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.