Maharashtra Rain Update | राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस ; NDRF व SDRF च्या १४ तुकड्या तैनात
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)च्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ तुकड्या तैनात आहेत.
नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरते निवारा केंद्र तयार करण्यात आले आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pravin Darekar | भारतीय जनता पार्टीचा जीव मुंबईत आहे – प्रवीण दरेकर
- Sanjay Jadhav : रामदास कदम कालपर्यंत मराठा नव्हते का?; संजय जाधव भडकले
- Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : “आज तुमचा वाढदिवस आहे, उद्या…” ; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर शिंदे गटाची प्रतिक्रिया!
- Bhai Jagtap | तब लडे थे गोरोसे अब लडेंगे चोरोसे – भाई जगताप
- Chandrakant Khaire : रामदास कदमांना मराठा नेत्यांवरून समाजात तेढ निर्माण करायचाय, चंद्रकांत खैरेंच वक्तव्य!
Comments are closed.