Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र परतीचा पावसाचे थैमान, तर ‘या’ जिल्ह्यात येलो अलर्ट
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या सगळीकडे परतीच्या पावसाने (Rain) थैमान घातले आहे. या परतीच्या पावसाळ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून राज्यातील शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. काल रात्री (दि. 17 ऑक्टोबर) रोजी पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलचं झोडपले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग बघायला मिळाली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे पुण्यातील नागरिकांची मोठी तारांबळ झाली. पुण्यात रस्त्यात जागोजागी पाणीसाठल्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. दरम्यान, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राज्यात अचानक विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आलेले असून त्याचा वाहतुकीवर खूप मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यालाही मोठा फटका बसलेला असून शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यात ‘या’ भागांमध्ये येलो पावसाचा (Rain) अलर्ट जारी
गेल्या अनेक दिवसापासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेली आहे. अनेक शहरातील रस्त्यांना चक्क नदी नाल्यांच्या स्वरूप आल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याकडून आजही विजांच्या कडकडाटंसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यातील काही ठिकाणी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यात पुणे, मुंबईसह कोल्हापूर, सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी सापडला संकटात
सध्या राज्यातील शेतकऱ्याचा खरीप पिक काढण्याच्या हंगाम सुरू असून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याची उभ्या पिकांची नासाडी झाल्याचे दिसत आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याचे चित्र समोर येत आहे. शेतीतील मका, सोयाबीन, मूग फळबागा इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आजही हवामान खात्याकडून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून करण्यात आलेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला रवाना
- Pune Rain | पुण्यात पावसाने क्षणात जनजीवन विस्कळीत! झोप उडाली, गाड्या वाहून गेल्या
- Uddhav Thackeray | “… म्हणून भाजपने माघार घेतली”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Shinde-Fadanvis | “माझ्या जीवाला काही झालं तर शिंदे-फडणवीस जबाबदार”, ठाकरे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप
- Sanjay Raut | पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करावा – ईडीची मागणी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.