‘गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी पाळणा हलणार का?’; सामनाच्या अग्रलेखातून सेनेचा इशारा

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भाजपकडून लवकरच गोड बातमी मिळेल असं सांगितलं जात असताना शिवसेनेनं मात्र, गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न वगैरे ठरले आहे? असं म्हणत गोड बातम्यांचे कितीही दाखले दिली तरी पाळणा हलणार का आणि तो कसा हलेल? असा प्रश्न विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे शिवसेनेचा शपथ ग्रहण करणार आहे असं म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर ठाम असल्याचंच सांगितलं आहे.

राज्यात महायुतीचं सरकार येईल असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोंडात साखर पडो. मात्र, प्रश्न असा आहे की, सरकार नक्की कधी येणार व महायुती ती कोणाची आणि कशी हे सांगितलं नाही असंही अग्रलेखात म्हटलं आहे. पुन्हा एकदा भाजप सरकार पुन्हा येणार नाही असं म्हणत मावळते मंत्री असा उल्लेख शिवसेनेनं केला आहे. राज्यात शिवसेनेचाच मुख्यंत्री व्हावा अशी मागणी जनतेतूनच होत असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.