InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधीमंडळातील दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला.  अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये आज अर्थसंकल्प सादर केला.

येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमुळे हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. यंदाचा अर्थ संकल्प हा तूटीचा अर्थ संकल्प आहे. यंदा १९ हजार ७८४ कोटी रुपयांची महसूली तूट आहे.

अर्थसंकल्पातील काही महत्त्वाचे मुद्दे –

 1. पंतप्रधान आवास योजनेसाठी ६८९५ कोटींची तरतूद
 2. पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद
 3. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची महारष्ट्रात 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी.
 4. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन आदी उपक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ
 5. स्मार्ट सिटी अभियानात पुणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड या 8 शहरांसाठी यंदा 2 हजार 400 कोटींची तरतूद
 6. 96 बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी खर्चाला मान्यता.
 7. ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरण्याकरीता उत्पन्नाची मर्यादा  रू. 8 लाख.
 8. युवकांना ‘प्रमोद महाजन कौशल्य व विकास अभियान’ अंतर्गत सक्षमीकरणासाठी यंदा 90 कोटींची तरतूद.
 9. ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा 2 हजार 164 कोटींची तरतूद
 10. ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी 6 हजार 306 कोटींची तरतूद
 11. राज्यातील न्यायालय इमारती, न्यायाधीशांची निवासस्थाने आदींच्या प्रयोजनार्थ यंदा 725 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
 12. राज्यातला शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी  देणार.
 13. पुऱ्या पावसामुळे बाधित 151 दुष्काळग्रस्त तालुके व 268 महसूल मंडळे व 5449 दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावांना मदत
 14. मुंबई मेट्रोचा विस्तार 276 कि.मी पर्यंत पसरवणार

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply