InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचा 71 वा वर्धापन आज राज्य राखीव पोलीस बल गट क्र-8 च्या गोरेगाव येथील मुख्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

गटाचे सहाय्यक समावेशक एल.एस. आतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस पथकाने संचलन केले. यावेळी बंदुकीच्या हर्ष फायररद्वारे 180 फैरी हवेत झाडून प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यात आली. तसेच पोलीस दलातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याचा गुणगौरव करुन विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली. पोलीस निरीक्षक एस. एस. मोहिते यांनी आभार मानले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.