महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन केला जाईल – नारायण राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला नितेश राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार असून, त्यादिवशीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडीत केली आहे. विलीनीकरणानंतर भाजप ज्या ठिकाणी मला सभेसाठी पाठवेल तिथे जाऊन मी सभा घेईन, असे राणे यांनी सांगितले.

Loading...

कणकवलीतील युती तुटण्याला सर्वस्वी शिवसेना जबाबदार असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे. एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक उजवे हात मानले जाणारे माजी आमदार राजन तेली यांनी पाच वर्षापूर्वी राणे पासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पाच वर्षानंतर सिंधुदुर्गचे राजकारण बदलले असून, राणे यांनीही काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.