महाराष्ट्र ७ जूनपासून अनलॉक! लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल… कुठे काय सुरु काय बंद? जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रातील जनता गाढ झोपेत असतानचसाखरझोपेत असतानाच राज्यामध्ये अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (५ जून) मध्यरात्रीनंतर हे नवे आदेश जारी करण्यात आले असून नवीन आदेशानुसार सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या आधारावर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशांमध्ये सर्वच गोष्टींचा उल्लेख आहे. जीम, लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल्स, सार्वजनिक वाहतूक, मैदाने, खासगी कार्यालये अशा सर्वांसंदर्भातील नियम या आदेशांमध्ये आहेत. जाणून घेऊयात हे पाच स्तर नक्की काय आहेत आणि कुठे कोणत्या सेवा सुरु असणार आहेत.

या पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी
पहिला गट

ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

दुसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

तिसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

चौथा गट

पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

पाचवा गट

पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.
अनलॉकच्या कोणत्या टप्प्यात किती जिल्हे?

पहिल्या गटातील जिल्हे – अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा.

दुसऱ्या गटातील जिल्हे – औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी.

तिसऱ्या गटातील जिल्हे – अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ.

चौथ्या गटातील जिल्हे – पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

(असे गट तयार करण्यात आलेले असले, तरी सरकारने परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला/आपत्ती व्यवस्थापन समितीला दिलेले आहेत.)

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा