Maharashtra Weather Update | महाराष्ट्र गारठला, तर उत्तर भारतातही थंडीचा कहर
Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह (Maharashtra) देशामध्ये सातत्याने वातावरणात (Weather) बदल होत आहे. यामध्ये कुठे थंडीचा कहर तर कुठे ढगाळ वातावरण दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तर, उत्तर भारतातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राजधानी दिल्लीमध्ये देखील थंडीच्या हुडहुडीमध्ये वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर कायम असेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा इशारा देखील करण्यात आला आहे.
आज सकाळी चंदिगड, हरियाणा, आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके पडले. दरम्यान, पुढील चार दिवस विविध ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी तापमानाच्या पाऱ्यामध्ये घसरण होणार आहे.
राज्यामध्ये कमाल तापमानात घट झाल्यामुळे हुडहुडी चांगलीच वाढली आहे. तर मुंबई पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी थंडी वाढली आहे. त्याचबरोबर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यासह उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर कायम असेल. त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये देखील किमान तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, थंडी वाढल्याने जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.
नाताळनंतर राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा पारा चढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, या वातावरणाचा काही शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे, तर काही शेतकऱ्यांना या थंडीचा खूप फायदा होणार आहे. कारण द्राक्षांच्या बागेला थंडीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे, तर गहू हरभरे कांदे इत्यादी पिकांसाठी ही थंडी फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या
- Prataprav Jadhav | महाविकास आघाडीच्या काळातील 100 खोक्यांची SIT मार्फत चौकशी करा – प्रतापराव जाधव
- MNS on Jayant Patil | “राष्ट्रवादीची शिवसेना” ; जयंत पाटलांचा VIDEO ट्वीट करत मनसेचा खोचक टोला
- Shambhuraj Desai | पत्राचाळ घोटाळ्यामध्ये किती खोक्यांचा व्यवहार झाला ; शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना सवाल
- Health Tips | रिकाम्या पोटी गाजराचा रस प्यायल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Ashish Shelar on Sanjay Raut | “संजय राऊत बोलघेवडेपणा करतात” ; आशिष शेलारांचा पलटवार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.