Maharashtra Weather Update | राज्यात तापमानाचा पारा घसरला, नाताळनंतर वाढणार आणखी थंडी

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये (Maharashtra) मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी तापमानात (Temperature) घट झाल्याचे चित्र समोर आले आहेत. त्यामुळे राज्यात गारठा (Winter) वाढत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. तर, नाताळनंतर राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा पारा चढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात गारठा आणखी वाढणार. मुंबईच्या तापमानामध्ये चांगलीच घट झाली आहे. 24 अंश सेल्सिअसवरून 19 अंश सेल्सिअसवर मुंबईचे तापमान घसरले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे.

गेल्या दोन दिवसापासून उत्तर महाराष्ट्रमध्ये थंडीची लाट कायम आहे. वाढत्या थंडीचा परिणाम जनजीवनावर मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील चांगलाच गारठा वाढत चालला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसनंतर राज्यामध्ये थंडीची हुडहुडी आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. मराठवाड्यामध्ये तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. औरंगाबादमध्ये 10.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यात थंडीची हुडहुडी चांगलीच वाढली आहे. तर, दुसरीकडे पुण्यामध्ये देखील तापमान 11.5 अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे पुणेकर सकाळच्या वेळी स्वेटर, कान टोपी घालून बाहेर पडताना दिसत आहे.

राज्यामध्ये हळूहळू थंडीचा कहर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर देखील झाला होता. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले होते. सध्या या चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. परिणामी राज्यात पुन्हा थंडीची हुडहुडी जाणवायला लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.