Maharashtra Weather Update | राज्यात थंडीची चाहूल, तर कोकणात सर्वत्र पसरली धुक्यांची चादर
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात Maharashtra कमाल आणि किमान तापमानात Temperature चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारवा Cold Weather वाढला असून दुपारी उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशातून निरोप घेतलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही परतीचा पाऊस माघारी फिरला आहे. परिणामी तापमानात घट होऊन सगळीकडे थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात सगळीकडे गारठा वाढत चाललेला असून पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगलाच आहे.
राज्यातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळे हुडहुडी वाढत चालली आहे. तर कोकणामध्ये सर्वत्र धुक्यांचा मोहर दिसायला लागला आहे. या बदलत्या वातावरणामध्ये सकाळी किमान तापमान असल्यामुळे थंडी वाढत चालली आहे. तर दुपारी उन्हाची चटके जाणवायला लागले आहेत. राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाची 20 अंशाच्या खाली नोंद करण्यात आली आहे.
कोकणात सर्वत्र धुक्यांची चादर
सकाळच्या वेळेला राज्यात सर्वत्र गारवा जाणवायला लागला आहे. दरम्यान, सध्या सकाळच्या वेळेला कोकणात मोठ्या प्रमाणात धुक्यांची चादर पसरल्याचे दिसत आहे. कोकणामध्ये सकाळच्या वेळेला धुक्यांची चादर जरी दिसत असली तरी दुपारच्या वेळेला कोकणामध्ये कडाक्याचे ऊन आहे. तर संध्याकाळी मात्र हवेत पुन्हा गारवा जाणवत आहे. सध्याचे कोकणामध्ये असलेले हे वातावरण आंब्याला मोहर येण्यासाठी पोषक आहे. कोकणातून परतीच्या पावसाने माघार घेतात कोकणात थंडीची चाहूल लागली आहे.
देशात सर्वत्र थंडीची Cold Weather चाहूल
महाराष्ट्र प्रमाणे देशात दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भागातही चांगलीच थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. राज्यात सध्या पर्यटकांसाठी चांगले वातावरण तयार झालेले असून पर्यटक या वातावरणाचा चांगलाच आनंद घेताना दिसत आहे. देशात अनेक ठिकाणी तापमानाची घट झाली असून दिवसा कडक ऊन अनुभवायला मिळेल तर, सूर्यास्तनंतर चांगलीच थंडी अनुभवायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या एका आठवड्यात देशभरात हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. दरम्यान रात्री तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअस घट झाली आहे. तर, देशात आणखी थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Saamana । सामानाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकांची बरसात
- Bhaskar Jadhav | “शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील लाखो बेरोजगारांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत”
- Ajit Pawar | टाटा एअरबस प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…
- Uddhav Thackeray | ‘पाकिस्तानविरुद्धचा सामना आपण जिंकलो कारण…’, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- Sachin Sawant । जितका काळ शिंदे-फडणवीस सरकार राहील, तितका महाराष्ट्र कंगाल होईल; काँग्रेसचा दावा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.