Maharashtra Weather Update | राज्यात थंडीत वाढ, तर तापमानात घट
Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात (Maharashtra) अनेक ठिकाणी वातावरणामध्ये (Weather) चांगलाच बदल होताना दिसत आहे. ऐन हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसाने (Rain) अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. तर, काही ठिकाणी कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या राज्यात तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट होताना दिसत आहे. गारठा वाढल्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे. आजपासून म्हणजेच 21 डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे किमान तापमानात घट झाली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तर, दुपारच्या वेळी राज्यात कमल तापमानात घट होऊन तापमान 29 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते.
आज पासून राज्यामध्ये पुन्हा थंडी वाढायचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम देशात सगळीकडेच झाला आहे. त्यामुळे देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. चक्रीवादळामुळे राज्यात थंडी कमी झाली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाले होते. तर, काही भागांना या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाला सामोरे जावे लागेल. मात्र, आता या चक्रीवादळाचा प्रभाव कमी झालेला असून राज्यात परत थंडीची हुडहुडी वाढणार आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका आता टळला आहे. दरम्यान, राज्यामध्ये 21 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये पावसाची शक्यता नाही. असा अंदाज हवामान खात्यातील ज्येष्ठ तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. तर, या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना सातत्याने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तर, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून, वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. दरम्यान, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. राज्यामध्ये वाशिम, नंदुरबार, बुलढाणा, हिंगोली, रायगड, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता”; उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Uddhav Thackeray | “आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा”; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
- Devendra Fadanvis | ‘लव्ह जिहाद’बाबत महाराष्ट्रातही कायदा होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
- Winter Session 2022 | NIT भूखंड मुद्द्यावरुन एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, विरोधकांचा विधानसभेत गदारोळ
- Saroj Ahire | “विधीमंडळाच्या इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना”; सरोज अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन
Comments are closed.