Maharashtra Winter Update | राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी, तर नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात (Maharashtra) गेल्या दोन दिवसापासून कडाक्याची थंडी (Winter) पडायला लागली आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यात सर्वत्र दहा अंशापेक्षा तापमान कमी आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात जागोजागी शेकोट्या पेटवायला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे या गुलाबी थंडीमध्ये व्यायाम किंवा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे. त्याचबरोबर लहान मुले शाळेत जाताना उबदार कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. अशात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा (Cold Wave) चा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान खाली आल्याचं दिसत आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे.

पुण्यासह मुंबईत देखील गुलाबी थंडी (Winter)

मुंबईतील दमट वातावरणात कधी थंडी अनुभवायला मिळत नाही असे आपण नेहमी ऐकून असतो. दररोजच्या दमट हवामानाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांनाही यावर्षी थंडीचा अनुभव येत आहे. मुंबईत हवेमध्ये गारवा जाणवायला लागलेला असून शहरांमध्ये किमान 17.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लोणावळ्यामध्ये 13.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर, दुसरीकडे कर्जतमध्ये तापमान 14°अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्याचबरोबर पुण्यातील तळेगावमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर पुण्यातील पाषाण भागामध्ये किमान 8.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.

नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद

राज्यामध्ये सर्वात अधिक थंडी नाशिक जिल्ह्यातील ओझर या ठिकाणी पडल्याचे दिसत आहे. ओझरमध्ये आज 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ही नोंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंत ही राज्यातील निचांकी तापमानाची नोंद आहे. परिणामी ओझरसह नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाण थंडीने गारठले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचा कहर वाढला आहे. दरम्यान, ग्रामीण भागांमध्ये सकाळी सकाळी धुक्यांची चादर पसरलेली दिसत आहे. तर दुसरीकडे गावांसह शहरांमध्ये देखील ठिकठिकाणी भल्या पहाटे लोक शेकोटीची उब घेताना दियात आहे. राज्यात पुढील काही दिवस हा पारा आणखीन घसरणार असल्याचे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.