Maharashtra Winter Update | राज्यात थंडीचा कडाका, तर पुण्यामध्ये तापमानाचा पारा 12.6 अंशावर
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात Maharashtra परतीचा पाऊस थांबून जवळपास एक आठवडा झाला आहे. त्यामुळे राज्यात कमाल आणि किमान तापमान Temperature चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान परतीच्या पावसाने राज्यातून माघार घेतल्यामुळे सगळीकडे थंडीचा Winter कडाका वाढला आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात सुरू झालेली बर्फवृष्टी आणि राजस्थान मधून येणारे थंड वारे यामुळे राज्यातील तापमानात घट होत असून वातावरणामध्ये गारठा वाढत चालला आहे. बदलत्या वातावरणामध्ये सकाळी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे तर दुपारी उन्हाची चटके जाणवायला लागले आहे. सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्याने देशातून निरोप घेतल्यामुळे वातावरणात हे बदल होत आहे.
पुण्यामध्ये थंडीचा Winter कडाका
राज्यामध्ये दिवाळीनंतर परतीचा पाऊस थांबून थंडीला सुरुवात झाली आहे. दरम्यान येत्या काळात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याचा आढावा घेतल्यास पुणे शहरांमध्ये तापमान 9.4 अंश सेल्सिअस पर्यंत नोंद झाले आहे. तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सातारा इत्यादी भागांमध्ये थंडीची हुडहुडी वाढत चालली आहे. तर, त्याचबरोबर कोकणात सर्वत्र थंडीमुळे धुक्याची चादर पसरल्याचे दिसत आहे.
वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांना होऊ शकते नुकसान
राज्यात परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी हंगामातील पेरणीला विलंब झाला आहे. राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे राज्यातील शेतकरी आधीच मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान, रब्बी हंगामाची पेरणी झाल्यानंतर पिकांना जमिनीतून वर येण्यासाठी उबदारपणा आवश्यक असतो. पण वाढत्या थंडीमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | “जनाची नाही तर मनाची ठेवा”, टाटा एअरबस प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
- Amol Mitkari | “माझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं, तर…”; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा
- Gulabrao Patil | “50 आमदार एकदम ओक्के, घरी…”; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्ला
- Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांना राणेंवरची टीका भोवली, कुडाळ पोलिसांनी नोटीस बजावली
- Rana-Kadu | राणा-कडू वाद होणार गोड? दोघेही शिंदे-फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.