Maharashtra Winter Update | राज्यात सर्वत्र पसरली गुलाबी थंडी, तर काही ठिकाणी मोसमातील निचांकी तापमानाची नोंद
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात बहुतांश भागामध्ये गुलाबी थंडी (Winter) पसरली असून काही ठिकाणी सकाळी धुक्याची चादर बघायला मिळत आहे. पुणे, सातारा, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. तर अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. महाबळेश्वरमध्ये तापमान 10.4 अंशावर पोहचलं आहे. तर वेण्यालेकला 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत राज्यांमध्ये सकाळी कडाक्याची थंडी, तर दुपारी उन्हाचे चटके अनुभवायला मिळत आहे.
राज्यात मोसमातील निचांकी तापमानाची नोंद
राज्यात सगळीकडेच थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. दरम्यान, महाबळेश्वरातील तापमान घसरले असून, तिथे तब्बल 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे वेण्यालेक परिसरामध्ये तापमान 6 अंशावर पोहोचले आहे. तर सातारा शहरातील अनेक ठिकाणी तापमान 15 अंशावर गेले आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानामध्ये चढ-उतार सुरू आहे. अशा वातावरणामध्ये सकाळी थंडीची हुडहुडी तर दुपारी उन्हाची चटके अनुभवायला मिळत आहे.
राज्यात थंडीचा (Winter) कडाका वाढला
राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यात रेंगाळलेल्या पावसानंतर थंडीचे आगमन झाले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने घसरताना दिसतोय. नाशिकचे तापमान तीन दिवसांमध्ये 13 अंश सेल्सिअस वरून 10.4 अंश सेल्सिअसवर आले आहे. नाशिकसह धुळे जिल्ह्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत आहे. धुळे शहरामध्ये काल 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज धुळ्याचे 8.2 अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले आहे. अशा परिस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचा कहर वाढला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात सकाळी सकाळी धुक्यांची चादर पसरलेली दिसत आहे. ठिकठिकाणी भल्या पहाटे लोक शेकोटीची उब घेताना. राज्यात नाशिकसह पुण्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढल्याचे दिसून आले आहे. या गुलाबी थंडीमध्ये पुणेकर कानटोप्या, स्वेटर घालून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना दिसत आहे. त्याचबरोबर रब्बी पिकांना पोषक वातावरण मिळाल्याने राज्यातील शेतकरी देखील आनंदात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare | “रावसाहेब दानवे आमचा गोरापान भाऊ, तर भुमरे…”, सुषमा अंधारे बरसल्या
- Congress | रणजीत सावरकर यांनी पंडित नेहरुंवर केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेत्याचा पलटवार, म्हणाले…
- Ranjeet Savarkar | “एका बाईसाठी पंडित नेहरुंनी देशाची फाळणी केली”, रणजीत सावकरांचा धक्कादायक आरोप
- Narayan Rane | “आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांना…”, नारायण राणेंचा खोचक टोला
- Uddhav Thackeray | “स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार…”, ठाकरे गटाने घेतला समाचार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.