Maharashtra – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Wed, 13 Nov 2019 10:48:22 +0530 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.3 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Maharashtra – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 दालन, फर्निचरसह इतर साहित्य परत करण्याचे माजी मुख्यमंत्र्यांना आदेश https://inshortsmarathi.com/cm-and-all-ministers-terminated-general-administration-department-issued-gr/ https://inshortsmarathi.com/cm-and-all-ministers-terminated-general-administration-department-issued-gr/#respond Wed, 13 Nov 2019 10:45:32 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86285

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्यमंत्र्यांसह सर्व राज्य आणि मंत्र्यांच्या पदाचा कार्यभार संपुष्टात आल्याचं परिपत्रक जारी झालं आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व विभागातील मंत्र्यांचे दालन, कार्यालयीन नोंद वह्या, फर्निचर इत्यादींची आवराआवर करण्याच्या आणि ताबा सुपूर्द करण्याचा आदेश यात देण्यात आला आहे. दालन/कार्यालयतील जडवस्तू, लेखनसामग्री, टपाल तिकीटे, रजिस्टर, हजेरीपट ,  मुख्यालय आरक्षण पुस्तिका, मंत्र्यांचे वेतन […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दालन, फर्निचरसह इतर साहित्य परत करण्याचे माजी मुख्यमंत्र्यांना आदेश InShorts Marathi.

]]>

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्यमंत्र्यांसह सर्व राज्य आणि मंत्र्यांच्या पदाचा कार्यभार संपुष्टात आल्याचं परिपत्रक जारी झालं आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व विभागातील मंत्र्यांचे दालन, कार्यालयीन नोंद वह्या, फर्निचर इत्यादींची आवराआवर करण्याच्या आणि ताबा सुपूर्द करण्याचा आदेश यात देण्यात आला आहे.

दालन/कार्यालयतील जडवस्तू, लेखनसामग्री, टपाल तिकीटे, रजिस्टर, हजेरीपट ,  मुख्यालय आरक्षण पुस्तिका, मंत्र्यांचे वेतन आणि प्रवास खर्चाच्या प्रती, मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल/ प्रमाणपत्र, मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे, दालन/कार्यालयातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य या सर्व गोष्टी परत करण्याचे आदेश परिपत्रकात देण्यात आला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता राज्याचा कारभार राष्ट्रपतींच्या देखरेखीत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पाहणार आहेत. प्रशासकीय पातळीवर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

प्रशासकीय पातळीवर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व विभागाचे सचिव, प्रधान सचिव आणि अधिकारी मुख्य सचिव अजॉय मेहता यांना रिपोर्ट करतील. यासोबत मंत्र्यांचे दौरे, बैठका बंद होणार आहे. लोकप्रतिनिधींना क्षेत्रीय प्रशासकीय यंत्रणांना लोकप्रतिधींना आदेश देता येणार नाहीत.

सात दिवसात सरकारी निवासस्थान सोडा, केंद्र सरकारची माजी खासदारांना तंबी

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दालन, फर्निचरसह इतर साहित्य परत करण्याचे माजी मुख्यमंत्र्यांना आदेश InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/cm-and-all-ministers-terminated-general-administration-department-issued-gr/feed/ 0 86285
राज्यातील राजकीय घडामोडी विषयी नो कमेंट्स- प्रकाश जावडेकर https://inshortsmarathi.com/prakash-javdekar-news-nanded/ https://inshortsmarathi.com/prakash-javdekar-news-nanded/#respond Wed, 13 Nov 2019 08:46:32 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86269

नांदेड : महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मी काही भाष्य करणार नाही, नो कमेंट्स असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलण्याचे टाळले. शिवसेनेकडे असलेले अवजड उद्योग खाते श्री. जावडेकर यांच्याकडे देण्यात आले असून त्याविषयी विचारल्यावरही त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. श्री गुरुनानक देवजी यांची ५५० वी जयंतीनिमित्त मंगळवारी नांदेडला मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यातील राजकीय घडामोडी विषयी नो कमेंट्स- प्रकाश जावडेकर InShorts Marathi.

]]>

नांदेड : महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मी काही भाष्य करणार नाही, नो कमेंट्स असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलण्याचे टाळले. शिवसेनेकडे असलेले अवजड उद्योग खाते श्री. जावडेकर यांच्याकडे देण्यात आले असून त्याविषयी विचारल्यावरही त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.

श्री गुरुनानक देवजी यांची ५५० वी जयंतीनिमित्त मंगळवारी नांदेडला मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजित बहुमाध्यम प्रदर्शनीचे उद्‍घाटन श्री. जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेकडील अवजड उद्योग हे खाते श्री. जावडेकर यांच्याकडे देण्यात आले असून त्याबद्दल विचारल्यावरही त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. मी नांदेडला धार्मिक कार्यक्रमासाठी आलो असून मी राजकीय घडामोडीवर इथे काही बोलणार नसल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

प्रदर्शनीच्या उद्‍घाटनानंतर श्री. जावडेकर यांनी जगाला एक ओंकारचा संदेश देणारे श्री गुरुनानक देवजी हे महान व्यक्ती होते. आपण सर्वप्रथम मानव आहोत, आपल्या सर्वांचा पालनकर्ता एकच असून आपआपसातील मतभेद दूर करुन प्रेमाने, शांततेने रहावे, असा संदेश त्यांनी दिला असल्याचे सांगून त्यांनी जगाला दिलेला संदेश आज ५५० वर्षी प्रकाशपर्व म्हणून आपण सर्वजण साजरे करत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तारपूर कॅरीडॉरचे महत्व ओळखून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली व एक चांगले काम झाले. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा संदर्भातही लवकरच एक फिल्म बनविण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यातील राजकीय घडामोडी विषयी नो कमेंट्स- प्रकाश जावडेकर InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/prakash-javdekar-news-nanded/feed/ 0 86269
अखेर काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होणार https://inshortsmarathi.com/maharashtra-election-2019-shiv-sena-form-government-ncp-congress-support/ https://inshortsmarathi.com/maharashtra-election-2019-shiv-sena-form-government-ncp-congress-support/#respond Mon, 11 Nov 2019 12:54:05 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86214

काँग्रेसनं अखेर शिवसेनेला पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यांच्या जोरावर त्यांचं संख्याबळ ११८ पर्यंत गेलं. मात्र, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ – अर्थात भाजपा-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली आणि त्याचा भडका उडाला. त्यामुळे ३० वर्षांपासूनचे हे मित्र सरकारस्थापनेसाठी एकत्र आले […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अखेर काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होणार InShorts Marathi.

]]>

काँग्रेसनं अखेर शिवसेनेला पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यांच्या जोरावर त्यांचं संख्याबळ ११८ पर्यंत गेलं. मात्र, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ – अर्थात भाजपा-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली आणि त्याचा भडका उडाला. त्यामुळे ३० वर्षांपासूनचे हे मित्र सरकारस्थापनेसाठी एकत्र आले नाहीत.

त्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत हालचालींना वेग आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या अनेक बैठका झाल्या. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्यास राष्ट्रवादीचे बहुतांशी नेते, आमदार तयार होतेच. त्यावर शरद पवारांनीही मोहोर उमटवली. पण, काँग्रेसकडून शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई अहमद पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या आणि प्रदीर्घ चर्चेनंतर, हो-नाही करता-करता काँग्रेसनंही महाशिवआघाडीला होकार दिला.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अखेर काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होणार InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/maharashtra-election-2019-shiv-sena-form-government-ncp-congress-support/feed/ 0 86214
आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला जाणार https://inshortsmarathi.com/ditya-thackeray-and-eknath-shinde-will-meet-governor-of-maharashtra/ https://inshortsmarathi.com/ditya-thackeray-and-eknath-shinde-will-meet-governor-of-maharashtra/#respond Mon, 11 Nov 2019 12:29:50 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86210

राज्यपालांच्या निमंत्रणानंतर आता अखेर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हे राजभवन इथं जाणार आहेत. यावेळी शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे जरी सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांची भेट घेण्याच्या […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला जाणार InShorts Marathi.

]]>

राज्यपालांच्या निमंत्रणानंतर आता अखेर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हे राजभवन इथं जाणार आहेत. यावेळी शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे जरी सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांची भेट घेण्याच्या तयारीत असले तरीही काँग्रेसचा अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही. बहुमताचा जादुई आकडा शिवसेना कसा गाठणार, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला जाणार InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/ditya-thackeray-and-eknath-shinde-will-meet-governor-of-maharashtra/feed/ 0 86210
भाजप-शिवसेनेच्या संघर्षावर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया https://inshortsmarathi.com/sadabhau-khot-reaction-on-maharashtra-government-formation/ https://inshortsmarathi.com/sadabhau-khot-reaction-on-maharashtra-government-formation/#respond Mon, 11 Nov 2019 12:25:08 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86207

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले. मात्र निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे या दोन्ही पक्षांत मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीत शिवसेना आणि भाजपसोबत महायुतीत इतरही काही घटकपक्ष होते. त्यामुळे आता या दोन प्रमुख पक्षात वाद निर्माण झाल्यानंतर घटक पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यातच सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजप-शिवसेनेच्या संघर्षावर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया InShorts Marathi.

]]>

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले. मात्र निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे या दोन्ही पक्षांत मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीत शिवसेना आणि भाजपसोबत महायुतीत इतरही काही घटकपक्ष होते. त्यामुळे आता या दोन प्रमुख पक्षात वाद निर्माण झाल्यानंतर घटक पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यातच सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘शिवसेनेनं घेतलेली भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. वरिष्ठ पातळीवर सत्तावाटपावरून ज्या चर्चा झाल्या, त्यामध्ये 50-50 चा सूर निघाला. पण जर 50-50 ठरलं असेल तर जागाही तेवढ्या यायल्या हव्यात ना? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे घटकपक्ष म्हणून निवडणूक निकालानंतरही आमच्याशी चांगला संवाद ठेवला. त्यामुळे आमची इच्छा होती की ही महायुती टिकावी,’ असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सत्तासंघर्षावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजप-शिवसेनेच्या संघर्षावर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/sadabhau-khot-reaction-on-maharashtra-government-formation/feed/ 0 86207
शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत कॉंग्रेस संभ्रमात https://inshortsmarathi.com/congress-is-confused-about-supporting-shiv-sena/ https://inshortsmarathi.com/congress-is-confused-about-supporting-shiv-sena/#respond Mon, 11 Nov 2019 12:13:56 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86202

शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेबाबत संध्याकाळी 7.30 पर्यंत निर्णय कळविण्यास सांगितले आहे. मात्र, शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत कॉग्रेसची भुमीका समोर आली नसल्याने शिवसेना बुचकळ्यात पडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेला पाठींबा देण्यासंदर्भात कॉंग्रेसमध्ये मतभेद आहेत. ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व संजय निरूपम यांचा शिवसेनेला पाठींबा देण्यास विरोध असल्याचे समजते तर राज्यातील इतर नेते शिवसेनेला […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत कॉंग्रेस संभ्रमात InShorts Marathi.

]]>

शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेबाबत संध्याकाळी 7.30 पर्यंत निर्णय कळविण्यास सांगितले आहे. मात्र, शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत कॉग्रेसची भुमीका समोर आली नसल्याने शिवसेना बुचकळ्यात पडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिवसेनेला पाठींबा देण्यासंदर्भात कॉंग्रेसमध्ये मतभेद आहेत. ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व संजय निरूपम यांचा शिवसेनेला पाठींबा देण्यास विरोध असल्याचे समजते तर राज्यातील इतर नेते शिवसेनेला पाठींबा देण्यासंदर्भात कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मनधरणी करत आहेत. शिवसेनेला पाठींबा देण्यासंदर्भात कॉंग्रेसची भुमीका समोर आली तरच सत्तास्थापनेबाबत शिवसेना पुढील निर्णय घेऊ शकणार आहे

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत कॉंग्रेस संभ्रमात InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/congress-is-confused-about-supporting-shiv-sena/feed/ 0 86202
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर प्रकृती अस्वस्थतेमुळे रूग्णालयात दाखल https://inshortsmarathi.com/senior-singer-lata-mangeshkar-rushed-to-breach-candy-hospital/ https://inshortsmarathi.com/senior-singer-lata-mangeshkar-rushed-to-breach-candy-hospital/#respond Mon, 11 Nov 2019 12:05:48 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86198

गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात केल दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. लता मंगेशकर यांचे वय सध्या 80 वर्षाचे असून श्वास घ्यायला त्रास होत असल्याची सकाळी त्यांनी तक्रार केली. त्यानुसार उपचारासाठी त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 'पानिपत चित्रपटाची लढाई आशुतोष […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर प्रकृती अस्वस्थतेमुळे रूग्णालयात दाखल InShorts Marathi.

]]>

गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात केल दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. लता मंगेशकर यांचे वय सध्या 80 वर्षाचे असून श्वास घ्यायला त्रास होत असल्याची सकाळी त्यांनी तक्रार केली. त्यानुसार उपचारासाठी त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर प्रकृती अस्वस्थतेमुळे रूग्णालयात दाखल InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/senior-singer-lata-mangeshkar-rushed-to-breach-candy-hospital/feed/ 0 86198
खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल https://inshortsmarathi.com/eat-because-you-feel-uncomfortable-sanjay-raut-admitted-to-auction-hospital/ https://inshortsmarathi.com/eat-because-you-feel-uncomfortable-sanjay-raut-admitted-to-auction-hospital/#respond Mon, 11 Nov 2019 11:02:52 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86196

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना मागील 15 दिवसांपासून माध्यमांसमोर शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडणारे संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर त्यांना उद्या घरी सोडण्यात […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल InShorts Marathi.

]]>

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना मागील 15 दिवसांपासून माध्यमांसमोर शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडणारे संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर त्यांना उद्या घरी सोडण्यात येईल अशी माहिती, राऊत यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी माहिती देताना सांंगितले.शिवसेना पदाधिकारी संजय राऊत यांच्यासोबत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील त्यांना भेटण्यासाठी थोड्याच वेळात लीलावती रुग्णालयात जाणार आहेत.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/eat-because-you-feel-uncomfortable-sanjay-raut-admitted-to-auction-hospital/feed/ 0 86196
आता भाजपचे मित्रपक्षही भाजपवर नाराज https://inshortsmarathi.com/alliance-parities-annoyed-bjp/ https://inshortsmarathi.com/alliance-parities-annoyed-bjp/#respond Mon, 11 Nov 2019 10:02:59 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86193

भाजपने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपचे मित्रपक्षही त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे. या संदर्भात उद्या हे सर्वजण भूमिका स्पष्ट करणार असून, या सर्वांना आता इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपवर मित्र पक्ष नाराज असून, भाजपने आतापर्यंत सत्ता स्थापनेच्या खेळात  आपल्याला कुठेही बोलविले नाही. याची […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आता भाजपचे मित्रपक्षही भाजपवर नाराज InShorts Marathi.

]]>

भाजपने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपचे मित्रपक्षही त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे. या संदर्भात उद्या हे सर्वजण भूमिका स्पष्ट करणार असून, या सर्वांना आता इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजपवर मित्र पक्ष नाराज असून, भाजपने आतापर्यंत सत्ता स्थापनेच्या खेळात  आपल्याला कुठेही बोलविले नाही. याची नाराजी या पक्षांमध्ये आहे. भाजपने मित्रपक्षांसोबत निवडणुका लढल्या असल्या तरी सत्तेत न जाण्याचा निर्णय फक्त भाजप नेत्यांच्या बैठकीतच घेतला. कुठल्याही बैठकीला बोलावलं नाही, सत्ता स्थापन करणार नाही, या बाबत कोणतीही कल्पना भाजपने दिली नाही, अशी या मित्रपक्षांची भूमिका आहे.

भाजपसोबत राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत शेतकरी संघटना, आरपीआय आठवले गट या मित्रपक्षांनी 164 जागांवर निवडणूक लढविली होती. या सर्वांना मिळून 105 जागा मिळाल्या होत्या. आता शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी फारकत घेतल्यानंतर भाजप विरोधात बसणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या मित्रपक्षांना काय मिळणार हाही प्रश्न आहे. आम्हाला विचारात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते, अशी यांची भूमिका  आहे. सध्या सदाभाऊ खोत, महादेव जानकर मोबाईल बंद आहेत, तर विनायक मेटे उद्या माध्यमांसमोर बोलणार आहेत.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आता भाजपचे मित्रपक्षही भाजपवर नाराज InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/alliance-parities-annoyed-bjp/feed/ 0 86193
‘पानिपत चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री’ https://inshortsmarathi.com/raj-thackeray-tweets-about-panipat-trailer/ https://inshortsmarathi.com/raj-thackeray-tweets-about-panipat-trailer/#respond Mon, 11 Nov 2019 09:58:17 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86189

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. ही चर्चा भव्यदिव्य सेट, गोवारीकरांचे दिग्दर्शन ते सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणारा अर्जून कपूर इथपर्यंत सुरू आहे. आता पुन्हा एकदा पानिपतचा ट्रेलर चर्चेत आला आहे, तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्विटमुळे! राज ठाकरे व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात चांगसली मैत्री आहे. राज […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘पानिपत चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री’ InShorts Marathi.

]]>

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. ही चर्चा भव्यदिव्य सेट, गोवारीकरांचे दिग्दर्शन ते सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणारा अर्जून कपूर इथपर्यंत सुरू आहे. आता पुन्हा एकदा पानिपतचा ट्रेलर चर्चेत आला आहे, तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्विटमुळे!

राज ठाकरे व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात चांगसली मैत्री आहे. राज ठाकरे कोणत्याही कलेला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. नुकताच त्यांनी ‘पानिपत’चा ट्रेलर बघितला व गोवारीकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या लढाईवर आशुतोष गोवारीकर चित्रपट काढत आहे, याचा ट्रेलर मी नुकताच बघितला. ट्रेलर इतका सुंदर आहे की, चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे, हा चित्रपट नक्की बघा. असे ट्विट राज यांनी केले आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘पानिपत चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री’ InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/raj-thackeray-tweets-about-panipat-trailer/feed/ 0 86189