InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Maharashtra

उदयनराजेंच्या निषेधार्थ फलटणबंद

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा पुतळा जाळल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात घोषणाबाजी करुन फलटण बंदचे आवाहन केले. या बंदला फलटणकर नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून रामराजे नाईक निंबाळकर यांचा विजय असोच्या घोषणा देण्यात आल्या तसेच खासदार उदयनराजे भोसले यांचा जाहीर निषेध…
Read More...

उदयनराजे भडकले, म्हणाले पिसाळलेल्या कुत्र्याला आधी आवरा

नीरा देवधर कालव्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातला संघर्ष चांगलाच पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीतून उदयनराजे तडक बाहेर पडले. पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी रामराजेंना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली. तसंच मी काही बांगड्या घातल्या नाही, वयाचा मान ठेवतो नाहीतर वयाचे असते तर जीभ हासडली असती, असा इशाराच त्यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेतून उदयनराजे रागाने बाहेर पडले. नीरा नदीच्या पाण्यावरून उदयनराजे…
Read More...

उदयनराजे भडकले; पवारांची बैठक सोडली अर्ध्यावर

नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावरुन रामराजे निंबाळकर-उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बैठक बोलविली होती. मात्र, ही बैठक उदयनराजेंनी अर्ध्यावर सोडून बाहेर आले.शरद पवारांची शिष्ठाई निष्फळ ठरली आहे. माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी पुन्हा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली.स्वयंघोषित भगिरथाने जाणीवपूर्वक या भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी रामराजे…
Read More...

उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार- मुख्यमंत्री

रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे.राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर शपथ घेणार आहेत.मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा राजभवन येथील गार्डनवर पार पडणार आहे.मंत्रिमंडळात सात जागा रिक्त आहेत. या जागांवर कोणत्या नेत्यांची वर्णी लागते ते पहाणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.…
Read More...

नाईक-निंबाळकर वादाला हिंसक वळण; रामराजेंचा जाळला पुतळा

बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वादाने शनिवारी हिंसक वळण घेतले. उदयनराजेंवर टीका केल्याने त्यांच्या समर्थकांनी पोवईनाका येथे रामराजेंचा पुतळा जाळून निषेध केला.नीरा देवघर धरणातील पाणीकारण तापतच चालले असून उदयनराजे- निंबाळकर हे एकमेकांवर टिकास्त्र सोडत आहे.‘कोणी कोणाचे पाणी पळविलेले नाही, रामराजेंनी पाण्याबाबत कधीही राजकारण केलेले नाही. मात्र, आमचे स्वयंघोषित छत्रपती खासदार उदयनराजे भोसले काही चक्रमांना…
Read More...

राज ठाकरेंनी कापला ‘५१’ किलो ‘EVM’ केक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस शुक्रवारी झाला.  या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी ५१ किलो ईव्हीएमचा केक कापला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ५१ किलोचा ईव्हीएम केक आणला होता.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वत्र ईव्हिएम चर्चेत होते. सर्व स्तरातून ईव्हिएम टिका होत असताना राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. मात्र, आता वाढदिवसाच्या दिवशी ईव्हीएमचा केक कापून त्यांनीही या पद्धतीला विरोध दर्शवला आहे असेच म्हणावे लागेल.वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या पत्नीसह…
Read More...

‘सामना’मधून एमआयएमचा समाचार

शिवसनेच्या मुखपत्रातून म्हणजेच 'सामना'मधून एमआयएमचा समाचार घेण्यात आला आहे. औरंगाबादचा हिंदू नामर्द बनलेला नाही. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्यांना 'औरंगाबादे'त घरात घुसून मारू, असा इशारा देत शिवसनेने एमआयएमवर निशाणा साधला.औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला होता. या वरून आमच्यातीलच एकाने दिलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा पराभव झाला. मात्र, या पराभवामुळे हिंदू…
Read More...

डॉक्टरांचे कामबंद आंदोलन पसरले देशभर

कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर शुक्रवारी (14 जून) संपावर होते.डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत पश्चिम बंगाल सरकार पुरेसे गंभीर नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. सरकारच्या निषेधार्थ तब्बल 700 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. या आंदोलनामुळे मुंबईसह महाराष्ट्र, तसेच दिल्ली व अनेक राज्यांतील आरोग्यसेवेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने डॉक्टरांशी चर्चा करून लवकर…
Read More...

भ्रष्ट पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट दिली- तनुश्री दत्ता

भ्रष्ट पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. एवढंच नाही तर सिनेसृष्टीत नाना पाटेकर यांनी माझाच नाही अनेक जणींचा छळ केला आहे असाही आरोप तनुश्रीने केला आहे.तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी आम्हाला पोलिसांच्या अहवालाची कोणतीही प्रत दिली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणी आम्ही जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही म्हटलं आहे.तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचा अहवाल ओशिवरा पोलिसांनी…
Read More...

#Me too प्रकरणः नाना पाटेकरांविरूद्ध पुरावेच नाही

अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.मात्र, आता ओशिवरा पोलिसांनी कोर्टात बी समरी अहवाल सादर केला असून त्यात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Read More...